मनोरंजन

‘पांडू’ चित्रपटामध्ये प्रविण तरडे साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका

Published by : Lokshahi News

अभिनेते प्रविण तरडे नेहमीच त्यांच्या कराराची भूमिकांमुळे चर्चेत असतात. आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले प्रविण तरडे लवकरच 'पांडू' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांचा करारी बाणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'पांडू' या चित्रपटामध्ये प्रविण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच त्यांचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या फोटोमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर करारी भाव दिसून येत आहेत. यात ते एकाशिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र साकारताना दिसत आहेत.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या आणि विजू माने यांचे दिग्दर्शन असलेल्या 'पांडू' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत या चित्रपटात कोणते कलाकार असतील याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातच प्रविण तरडेंना नव्या रुपात पाहिल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणि उत्कंठा आणखीनच वाढली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर