मनोरंजन

प्रेमासारखं कुठलेही सुख नाही; उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'प्रेमास रंग यावे' मालिका

Published by : Sagar Pradhan

सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या.

अशीच एक वेगळी गोष्ट सन मराठी घेऊन येत आहे. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं कशावर प्रेम करतो? त्या व्यक्तीच्या रंग-रूपावर, श्रीमंतीवर, कि त्या व्यक्तीच्या चांगुलपणावर, त्याच्या सुंदर मनावर? सन मराठीवरील २० फेब्रुवारीपासून, सोमवार ते शनिवार रात्री ९.३०वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली 'प्रेमास रंग यावे ही मालिका नेमकी ह्याच प्रश्नाभोवती फिरते. ही गोष्ट आहे एका अत्यंत हुशार, सालस, सहृदयी अक्षराची आणि एका चांगल्या मनाच्या पण खुशालचेंडू, न्यूनगंडाने भरलेल्या आणि पारंपरिक अर्थाने देखणा नसलेल्या सुंदरची.

सन मराठीवरील ही नवीन मालिका सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं माणूस असणं कितीतरी पटीने जास्त महत्वाचं आहेत ह्याची जाणीव करून देते शिवाय मन चांगलं असेल तर मनासारखा जोडीदारही मिळतो हे पटवून देते. कारण म्हणतात ना, प्रेमासारखं दुसरं कुठलं सुख नाही. प्रेमाला कुठला रंग, कुठलं रूप नाही.

या मालिकेत मनमिळाऊ आणि सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या 'अक्षरा' या मुख्य पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री अमिता कुलकर्णी असून निर्मळ मनाच्या पण शून्य व्यवहारज्ञान असलेल्या सुंदरची भूमिका सादर करणार आहे अभिनेता रोहित शिवलकर. या सोबतच समीरा गुजर- जोशी, अभिजित चव्हाण, सारिका नवाथे, मोनिका दाभाडे, संजीव तांडेल,किरण डांगे, सचिन माने, गौरी कुलकर्णी, विद्या संत असे अनेक कलाकार मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब ही निर्मिती संस्था करत असून मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड ह्यांनी केले आहे.

सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना