भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं नुकतचं निधन झालं असून वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेर आज ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान मोदी व लतादीदी यांच्यातील नातं हे बहीण भावाचं होतं. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी 'मोदी पंतप्रधान व्हावेत' अशी जाहीर इच्छाही लतादीदींनी बोलून दाखवली होती. आज सकाळी दीदींच्या निधनानंतर मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला.
दीदींच्या अंत्यदर्शनासाठी मोदी मुंबईत येणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली होती.
दीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साडे चारच्या सुमारास मुंबई येथे पोहचले . दरम्यान मोदींना विमानतळावर भेटून राज्यमंत्री व युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे व पंतप्रधान मोदी एकत्र शिवाजी पार्कमध्ये पोहोचले आहेत.