मनोरंजन

Prithvik Pratap: पृथ्वीक प्रतापच्या नव्या प्रवासाला सुरुवात! गुपचूप उरकले लग्न

पृथ्वीक प्रतापने त्याच्या नव्या प्रवासाची साक्षीदार म्हणजेच त्याची जोडीदार शोधली पाहा कोण आहे ती.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक जण यशाचा टप्पा गाठत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या स्वप्नपूर्तीची सुरुवात करायला सुरु केलं आहे. हे सर्व कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत आणि आपली ओळख निर्माण करू लागले आहेत. प्रत्येक कालाकाराचा स्वतःचा असा वेगळा आणि मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम आता लोकप्रिय कार्यक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो असं म्हणायला काही हरकत नाही. या कार्यक्रमाने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेले आहे.

या कार्यक्रमातील कलाकार पृथ्वीक प्रताप हा सध्या चर्चेत येताना दिसत आहे. पृथ्वीकने नवीन आलिशान असं त्याचं स्वतःच घर घेतलं होत आणि पृथ्वीकने लक्झरी कार देखील खरेदी केली होती. त्यामुळे त्याच्या स्वप्नपूर्तीला उधाणं आल्याचं पाहायला मिळालं. हे सर्व होत असतानाच आता पृथ्वीक प्रतापने त्याच्या नव्या प्रवासाची साक्षीदार म्हणजेच त्याची जोडीदार प्राजक्ता हिच्या सोबत लग्नबंधनात अडकला आहे. आजचं त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे. या जोडप्याने त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पृथ्वीकने पोस्ट करत असताना "२५-१०-२०२४ एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!" असं गोड कॅप्शन देखील दिल आहे. त्याचसोबत त्याला अनेक त्याच्या हास्य मित्रांकडून म्हणजेच हास्यजत्रेतील कलाकारांनी अभिनंदन केलं आहे त्याचसोबत अमृता खानविलकर, अभिजीत खांडकेकर, पुजा सावंत यांच्याकडून देखील शुभेच्छा मिळालेल्या पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा