मनोरंजन

Salaar Poster Out: पृथ्वीराज सुकुमारन 'सालार' चित्रपटात साकारणार ही महत्त्वाची भूमिका

पृथ्वीराज सुकुमारनचा वाढदिवसानिमित्त ‘सालार’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मेकर्सनं प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं.

Published by : Team Lokshahi

साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा काल 40 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘सालार’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मेकर्सनं प्रेक्षकांना एक खास गिफ्ट दिलं. सालार चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. त्याच्या या लूकची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

पृथ्वीराज सुकुमारनच्या वाढदिवसानिमित्त पृथ्वीराज चित्रपटाच्या निर्मात्यांनी पृथ्वीराजच्या लूकचे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरमध्ये पृथ्वीराज हा नाकात रिंग, इअरिंग्स आणि गळ्यात चोकर आणि कपाळावर टिळा अशा लूकमध्ये दिसत आहे. पृथ्वीराजच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी पृथ्वीराजच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

पृथ्वीराजने ट्विटरवर संपूर्ण 'सलार' चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ''धन्यवाद, होंबळे फिल्म्स, प्रशांत नील, प्रभास आणि सालारच्या संपूर्ण टीमचे आभार! '.

सालार हा चित्रपट आधी 28 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा