मनोरंजन

Priyanka Udhwani | “अंतर्वस्त्र घ्यायला पैसे नसतील तर…”

Published by : Lokshahi News

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून प्रियांका घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत ती करिश्माची व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रियांकाचं याच मालिकेतील सहकलाकाराशी सूत जुळलंय. या मालिकेतील नमन म्हणजेच अभिनेता अंशुल पांडे आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे सतत आपले खासगी फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात. चाहते याला भरभरून दाद देत असतात.

मात्र, सध्या प्रियांका उध्वानी तिच्या चाहत्यांकडून भलतीच ट्रोल होताना दिसतीय. यासाठी तिची पोस्ट कारणीभूत ठरली आहे.

प्रियांका उध्वानीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अंशुलसोबत एक बोल्ड फोटो शेयर केला. दोघेही काळ्या कलरच्या कोटमध्ये असून त्यांनी अंतर्वस्त्रे न घालता हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो बोल़्ड असल्याने चाहते मात्र भलतेच नाराज झालेत. तर काहींनी प्रशंसा केली.

प्रियांका आणि अंशुल सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. अभिनेत्रीनां आपल्या हटके स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्या बोल्ड लुकवर नाराज होऊन एकाने ट्रोल करत म्हटलं आहे, 'तू अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस, लाज वाटते तुझी. अंतर्वस्त्रे घ्यायला पैसे नसतील, तर मी देते.. पण असा घाणेरडा प्रकार करु नको'. अशा भाषेत प्रियांकाला एका महिला ट्रोलरने ट्रोल केलं आहे. अशा पद्धतीने प्रियांका उध्वानीचं नव्हे, तर याआधी अनुषा दांडेकर, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा ट्रोल झाल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा