Admin
मनोरंजन

प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री

प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रियांका चोप्रा ठरली British Vogue मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रियांकाचे काही फोटो दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रियांका क्लासी लूकमध्ये दिसत आहे. तसेच ब्रिटिश वोगच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये प्रियांका ही तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहे.

प्रियंका चोप्राची नुकतीच ‘द मॅट्रिक्स रिकर्शन’मध्ये दिसली होती. त्यानंतर प्रियांका ‘एंडिंग थिंग्ज टेक्स्ट फोर युन’ आणि ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त प्रियांका बॉलिवूडमध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. प्रियांकाच्या बाजीराव मस्तानी,दिल धडकने दो, डॉन-2, मेरी कोम, बर्फी, द स्काय इज पिंक या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2015 मध्ये प्रियंका चोपडाला अमेरिकन गायक निक जोनस याने प्रपोज केले होते, ज्यानंतर दोघं तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2018 मध्ये जोधपूर येथे दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. 2021 जानेवारीमध्ये प्रियांका आणि निक जोनस एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा