मनोरंजन

आई झाल्यामुळे प्रियांका चोप्रा ‘या’ चित्रपटातून पडली बाहेर

Published by : Lokshahi News

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास नुकतेच पालक झाले आहेत. मात्र, आई बनल्याने प्रियांका चोप्राच्या आगामी प्रोजेक्ट्सवर परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे प्रियंका चोप्रा 'जी ले जरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. प्रियांका आई झाल्यानंतर चित्रपटातून बाहेर पडू शकते.

प्रियंका चोप्राने या प्रोजेक्टसाठी दुसऱ्या अभिनेत्रीशी बोलण्यासाठी दिग्दर्शक फरहान अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी यांच्याशी चर्चा केली आहे. प्रियांकाला आपल्या मुलांना आणि कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार होती. याआधी प्रियांका चोप्रानेही सलमान खानचा भारत हा चित्रपट तिच्या लग्नासाठी सोडला होता.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या बाळाचा जन्म 12 आठवडे लवकर झाला. यामुळे प्रियांका चोप्राने तिचे सर्व वेळापत्रक पुढे ढकलले आहे. फरहान आणि रितेश सिधवानी यांनी या चित्रपटात प्रियंकाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा