मनोरंजन

एका इन्स्टा पोस्टमधून प्रियांका चोप्रा कमावते ‘एवढे’ कोटी

Published by : Lokshahi News

बॉलिवूड सेलिब्रिटींसह हॉलिवूड आणि क्रिडा जगतातले अनेक सेलिब्रटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचं आपण पाहतो. खास करून इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत हे सेलिब्रिटी चाहत्यांशी संवाद साधत असतात. इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हे सेलेब्स केवळ चाहत्यांशी संवाद साधत नाही तर इन्स्टावरून ते कमाई देखील करत असतात. अनेक ब्रॅण्डसाठी सेलिब्रिटी प्रमोशनल पोस्ट शेअर करत असतात. या प्रत्येक पोस्टमधून ते बक्कळ पैसे कमावत असतात. इन्स्टाग्रामने यापैकी काही टॉप सेलिब्रिटींची यादी जाहीर केलीय. यात हॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच भारतीय सेलेब्सचा देखील समावेश आहे.

तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा भारतातील पहिला सेलिब्रिटी आहे. संपूर्ण जगाच्या यादीत तो १९व्या क्रमांकावर आहे. विराट एका पोस्टसाठी ५ कोटी रूपयांहून अधिक मानधन घेतो. (Photo-instagram@virat.kohli)

तर बॉलिवूडची देसी गर्ल अनेकदा इन्स्टाग्रामवर विविध ब्रॅण्डस् प्रमोट करताना दिसते. या प्रत्येक इन्स्टा पोस्टसाठी प्रियांका चोप्रा ३ कोटी रुपये घते. इन्स्टाग्रामच्या या टॉप १०० लिस्टमध्ये प्रियांका चोप्रा वगळता कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीचा समावेश नाही. (Photo-instagram@priyankachopra)

द रॉक' म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेला रेसरल आणि हॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. रॉक एका इन्स्टा पोस्टमधून ११ कोटी रुपये कमावतो.(Photo-instagram@ therock)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Late Raj Kapoor Life Gaurav Award : अनुपम खेर यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितल्या आठवणी म्हणाले की, “ त्यावेळी टॅलेंटपेक्षा..."

Late Raj Kapoor Life Gaurav Award : काजोल पुरस्कार घेताना भावूक म्हणाली, "आज मला वाटतं..."

Weather Update : पूर्व विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : कबुतरखाना हटवण्यावरुन जैन समाज आक्रमक; आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री काढली