मनोरंजन

Priyanka Chopra: भारताच्या देसी गर्लला मिळाली ऑस्ट्रेलियात प्रसिद्धी! 'या' प्राण्याला देण्यात आलं प्रियंका चोप्राचं नाव...

भारताची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे नेहमी चर्चेत असते.

Published by : Team Lokshahi

भारताची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे नेहमी चर्चेत असते. सौंदर्याची खाण असणारी प्रियंका चोप्रा ही एकेकाळची मिस वर्ल्ड म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये आपली अनोखी छाप सोडल्यानंतर प्रियंका चोप्रा आता हॉलीवूडमध्ये आपली अनोखी ओळख निर्माण करतं आहे. प्रियंका चोप्रा नुकतीच ऑस्ट्रेलियाला गेली होती. तिचा आगामी चित्रपट "द ब्लफ" याचे शूटिंग ऑस्ट्रेलियामध्ये होत या दरम्यान प्रियंका चोप्रा ऑस्ट्रेलियाला गेली होती.

शूटिंगमधून वेळ काढून ती ऑस्ट्रेलिया फिरण्यासाठी गेली आणि यादरम्यान ती गोल्ड कोस्ट येथील पॅराडाइज कंट्रीमध्ये गेली होती आणि तिथे ती कोआला या प्राण्याला ती भेटली आणि त्यावेळेस तिथल्या सरकारने प्रियंका चोप्राला आनंदाचा झटका दिला. तेथील कोआला या पआण्याला तिथल्या सरकारने प्रियंका चोप्राचे नाव दिले ही खूप अभिमानास्पद बाब आहे.

यावर प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यात ती कोआला या प्राण्यासोबत दिसत आहे. या पोस्टमध्ये प्रियंका चोप्राने लिहलं आहे, माझ्या नावावर 8 महिन्यांचा कोआला जोई!! माझे नाव या कोआला प्राण्याला दिल्याबद्दल धन्यवाद. हे खूप गोड आहे.. पुढे ती म्हणाली , धन्यवाद@paradisecountrygcसुंदर भेटीसाठी आणि आम्हाला सर्वात आश्चर्यकारक वन्यजीवांची ओळख करून दिल्याबद्दल. मीरकाट्स, कोआला, कांगारू, तस्मानियन डेव्हिल आणि डिंगोज! ऑस्ट्रेलियातील वन्यजीव संवर्धनासाठी तुम्ही करत असलेल्या सर्व कामांबद्दल धन्यवाद. जादुई रविवारची दुपार.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली