Priyanka Chopra Team Lokshahi
मनोरंजन

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने 'फादर्स डे' निमित्त शेअर केला मुलीचा फोटो

प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूडची (Bollywood) देसी गर्ल म्हटली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या मदरहुड एंजॉय (Enjoy motherhood) करत आहे. तर कुटुंबासोबत घालवावे हे क्षण अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसह हे क्षण शेअर करत असते. यातच प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्रियांकाची मुलगी आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) एकत्र दिसत आहेत.

काल जगभरात फादर्स डे (Father's Day) साजरा करण्यात आला. या खासप्रसंगी, अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या मुलीच्या वतीने नुकताच वडील झालेला पती निक जोनाससाठी एक भावनिक नोट शेअर केली. शेअर केलेल्या या फोटोमध्ये निक जोनास मुलगी मालतीला हात धरून उभे राहण्यास मदत करताना दिसत आहे. मात्र, या फोटोत वडील आणि मुलीचे चेहरे दिसत नाहीआहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रियंका चोप्राने लिहिले, 'हॅपी फादर्स डे माय लव्ह. आपल्या लहान मुलीसोबत तुला पाहून मला खूप आनंद होतो. मी तुझ्यावर प्रेम करते घरी परतण्याचा किती छान दिवस आहे. येणारे दिवसही असेच जावो. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या मुलीला आणि पतीला कस्टमाईज्ड शूजही (Customized shoes) भेट दिले आहेत. भेटवस्तू मालतीच्या बुटावर M हे अक्षर लिहिले आहे. त्याचबरोबर निक जोनासच्या बुटावर MM असे अक्षर लिहिले आहे.

विशेष म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वर्षी पालक बनले आहेत. जानेवारीमध्ये त्यांच्या प्रीमैच्योर मुलीचा जन्म झाला. प्रीमैच्योर जन्म झाल्यामुळे तिच्या मुलीला 100 दिवस एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर 8 मे रोजी मदर्स डेच्या निमित्ताने प्रियांका आणि निक त्यांची मुलगी मालतीला घरी घेऊन आले. प्रियांका आणि निक यांनी 2018 मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य