Priyanka Chopra,Nick Jonas Team Lokshahi
मनोरंजन

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा घालते निक जोनासचे प्रत्येक कपडे, म्हणाली फक्त एक गोष्ट घालू शकत नाही

प्रियांका चोप्रा पती निक जोनासच्या कपड्यांमध्ये अनेकदा दिसली आहे.

Published by : Team Lokshahi

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पती निक जोनासच्या (Nick Jonas) कपड्यांमध्ये अनेकदा दिसली आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान प्रियंका चोप्राने सांगितले की, ती निककडून अनेक गोष्टी चोरते. प्रियांकाने सांगितले की, निकचे शूज फिट होत नाहीत नाहीतर तिने तेही घातले असते.

Citedel वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान प्रियांकाने अनेकदा निकचे जॅकेट घातलेले दिसले. एलिट डेलीशी बोलताना प्रियांकाने खुलासा केला की तिने निकच्या वॉर्डरोबमधील जवळपास सर्व काही चोरले आहे. प्रियांका म्हणते, मी बहुतेक माझ्या पतीचे कपडे घालते. मी त्याची सर्व जॅकेट आणि चष्मा घातला आहे. मला त्याचे शूज फिट येत नाहीत नाहीतर मी ते पण घातले असते. प्रियांका म्हणते की मी निकपेक्षा तिचे कपडे जास्त परिधान केले आहेत. माझ्या चाहत्यांना हे चांगलेच माहीत आहे. खरंच त्याचा कपड्यांचा कलेक्शनअप्रतिम आहे.

प्रियांका लवकरच रुसो ब्रदर्स निर्मित सिटेडेलमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'एन्डिंग थिंग्ज' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या हॉलिवूड चित्रपटात काम करणार आहे. यासोबतच प्रियांका चोप्रा अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा