बॉलिवूडची देसी गर्ल आणि आंतरराष्ट्रीय स्टार प्रियांका चोप्रा- जोनासने मुंबईतील तिचे 4 फ्लॅट विकले आहेत. हे फ्लॅट सुमारे 16.17 कोटी रुपयांना विकले गेले असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारपैकी तीन फ्लॅट १८ व्या मजल्यावर आहेत. तर एक फ्लॅट 19 व्या मजल्यावर आहे. पहिले फ्लॅटचे क्षेत्रफळ 1,075 चौरस फूट असून तो 3.45 कोटी रुपयांना विकला गेले आहे. या फ्लॅटसाठी खरेदीदाराने 17.26 लाख रुपयांची मुद्रांक शुल्क भरले. याठिकाणी कार पार्किंगचीही जागा आहे.
दरम्यान एक प्रियंकाचा दुसऱ्या फ्लॅटचे क्षेत्रफळ 885 चौरस फूट आहे. त्याघराची विक्री 2.85 कोटी रुपयांना झाली. त्याचप्रमाणे प्रियंकाचे तिसरे घर १९ व्या मजल्यावर असून आणि ते 1,100चौरस फूट जागेत पसरलेले आहे. या घराची विक्री 3.52 कोटी रुपायांना झाली. अभिनेत्रीचे चौथे घर डुप्लेक्स असून त्याचे क्षेत्रफळ 1,985 चौरस फूट आहे. हे घर 18 व्या मजल्यावर आहे. या घरासाठी खरेदीदाराला 6.35 कोटी रुपये मोजावे लागले.
प्रियंकाने चोप्राने आधीच्या तिच्या अनेक मालमत्ता विकल्या आहेत. प्रियंचाच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर 2018 मध्ये ती अमेरिकेन गायक निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर प्रियंका लॉस एंजेलिसमध्ये कुटुंबासोबत राहत आहे.