PRIYANKA CHOPRA Team Lokshahi
मनोरंजन

प्रियंका चोप्राने केले आजीसोबतचे फोटो पोस्ट...

Published by : Saurabh Gondhali

हिंदी चित्रपट सृष्टीतील BOLLYWOOD अभिनेत्री व हॉलीवूड HOLLYWOOD मध्ये सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवणारी प्रियंका चोप्रा PRIYANKA CHOPRA हिने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या आजी सोबत चे स्वतःचे लहानपणीचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधून तिने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रियंका गेल्या काही वर्षांपासून हॉलीवूड मध्ये चांगल्या प्रकारे सक्रिय आहे. तिने तिथे वेबसिरिज, चित्रपटांमधून काम केले आहे. तिने निक जोन्स या हॉलिवूड अभिनेत्याबरोबर लग्न सुद्धा केले आहे.

हे फोटो टाकताना प्रियांका म्हणते, ''आम्ही आज माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करत आहोत. माझे आई आणि वडिल वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत असताना माझ्या आजीने मला वाढवलं. तिने आमचे कुटुंब सांधले. माझ्या संगोपनात आणि जडघडणीत तिचा मोठा वाटा आहे. मला साथ देणाऱ्या, माझ्यावर माया करणाऱ्या अनेक स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आजी तुझी नेहमी आठवण येते आणि प्रियम माथूर तू नेहमीप्रमाणेच गोड दिसत आहे." असे कॅप्शन प्रियांकाने त्या फोटोंना दिले आहे. काही तासातच लाखो चाहत्यांनी हे फोटो पहिले असून यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये, प्रियंका, तिची आई मधु चोप्रा, आजी आणि तिची बहीण प्रियम माथूर (priyam mathur) दिसत आहे. हे फोटो तिच्या आजीच्या वाढदिवसाचे आहेत. आजी म्हणजे तिच्या पाठीशी असलेला सर्वात सशक्त ममत्वाचा आधार असल्याचे प्रियंकाने म्हंटले आहे. आज आजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा तिने हे फोटो आणि काही आठवणी शेअर केल्या आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोत ती आजीला घास भरवते आहे. या फोटोला तिने कॅप्शनही मस्त दिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा