मनोरंजन

Priyanka Chopra : इंस्टाग्रामवरून गायब झालं प्रियांका चोप्राचं अकाउंट!

Published by : Shweta Chavan-Zagade

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर (Social Media ) खूपच सक्रिय असते. प्रियांका तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून तिच्या खासगी आयुष्यातील अनेक फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे ८० मिलियन म्हणजेच ८ कोटी फॉलोवर्स आहेत. मात्र एका गोष्टीने तिच्या चाहत्यांचीही चिंता वाढवली. आज सकाळपासूनच कित्येक चाहते तिच्या फॅनपेज अकाउंटवर पोस्ट करत एकच प्रश्न विचारत आहेत, तो म्हणजे प्रियांकाचं इंस्टाग्राम अकाऊंट कुठे गेलं?

प्रियांकाचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झालं होतं. त्यामुळे प्रियांकाचे चाहतेही चकित झाले होते. प्रियांकाचं अकाउंट नेमकं कुठे गेलं असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे त्यांनी तिच्या फॅनपेजवर हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या गोंधळाला शेवटी प्रियांकाच्या पीआर टीमकडून दूर करण्यात आलं. प्रियांकाचं अकाऊंट काही काळाकरिता डाउन झालं होतं. जे लवकरच रिस्टोर करण्यात आलं आहे. सध्या तिचं अकाउंट बॅकअप मोडवर सुरू आहे. परंतु, पीआर टीमने दिलेल्या माहितीनुसार, तिचं अकाउंट पुन्हा पूर्वीसारखे सुरू करण्यात आले.

प्रियांका एक आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. संपूर्ण जगभरात तिचे चाहते आहेत. जर तिच्या अकाउंटला रिस्टोर करण्यात अडचण आली असती तर तिच्या फॉलोवर्सची संख्याही पुन्हा शून्यावर आले असेत. त्यामुळे तिचं अकाउंट पुन्हा पूर्वीसारखे करण्यात आले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...