Priyanka Chopra Team Lokshahi
मनोरंजन

'फोकस फक्त हिप्स आणि बू** वरच', भारतीय सिनेमाबद्दल प्रियंका चोप्राचे विधान, झाली ट्रोल

प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत चर्चेत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. प्रियांका चोप्राने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांआधीच प्रियांका चोप्राने बॉलिवूड इंडस्ट्रीतील सत्य लोकांना सांगितले. दरम्यान, प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.

प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, या क्लिपमध्ये 68व्या एमी अवॉर्ड्सदरम्यान प्रियांका एका पत्रकाराशी बोलताना दिसली होती. प्रियांका म्हणते की भारतीय चित्रपट हे फक्त हिप्स आणि बुब्सबद्दल असतात. यानंतर ती काही डान्स मूव्ह देखील दाखवते. प्रियांका चोप्राचे एक विचित्र वक्तव्य ऐकून लोक संतापले आहेत. लोक म्हणतात की प्रियांकाला फक्त भारतीय चित्रपटांमुळेच ओळख मिळाली आणि आज ती संपूर्ण जगासमोर त्याची खिल्ली उडवत आहे.

दरम्यान प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, जे लोकांना खूप आवडतात. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, प्रियंका चोप्रा कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत जी ले जरा या चित्रपटात लवकरच दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा