Priyanka Chopra, left, and Nick Jonas arrive at the 62nd annual Grammy Awards at the Staples Center on Sunday, Jan. 26, 2020, in Los Angeles. (Photo by Jordan Strauss/Invision/AP) 
मनोरंजन

प्रियांकाने सोशल मीडिया वरून काढले जोनस आडनाव

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनस याच्याशी लग्न केलं. आणि या दोघांची जोडी ही लोकप्रिय होती. दरम्यान प्रियांकाने निक सोबत लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंट निक जोनसचे आडनाव लावले होते. परंतु आता प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट जोनस हे आडनाव वगळले आहे. यामुळे आता या दोघांच्या जोडीची चर्चा होत असल्याच दिसून आलं आहे.

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी जयपूरमध्ये लग्न केले. त्यानंतर दोघांच्या जोडीची चर्चा जगभरात सुरूच होती, परंतु आता या जोडीची चर्चा एक वेगळ्या स्वरुपात होत आहे असा दिसून आलं. असे म्हटले जाते की निकला त्याचा आगामी कॉमेडी शो 'जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट'च्या प्रमोशनसाठी प्रियांकाने अस केलं असावे अशी चर्चा देखील सुरू आहे. आणि दुसरीकडे, अशी चर्चा होते कि, काल तीने सोशल मीडिया अकाउंट वरून जोनस हे आडनाव काढले. त्यानंतर प्रियांकाने आज सोशल मीडियावर 'मॅट्रिक्स ४'चा पोस्टर शेअर केलं आहे. अश्या दोन्ही चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. या पैकी कोणते एक कारण आहे, की अजून कोणते कारण आहे. असा प्रश्न देखील नेटकऱ्यांना पडला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा