मनोरंजन

‘Jhund’ निर्मार्त्याचा प्रश्न ‘The Kashmir Files’ कर मुक्त का?

Published by : Team Lokshahi

कश्मिरी पंडितावर आधारित "द काश्मिर फाईल्स" (The Kashmir Files) चित्रपटचे यश दिवसेदिवस वाढत आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. आता या चित्रपटाबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, या चित्रपटामुळे नवा वाद सुरु झाला आहे. तर अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त झाल्यानंतर आता असे आणखी काही चित्रपट असल्याचे बोलले जात आहे ज्यात महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत, मात्र ते करमुक्त करण्यात आले नाहीत.

झुंड चित्रपटाची निर्मातीचा प्रश्न
अशीच एक तक्रार "झुंड" (Jhund) चित्रपटाची निर्माती सविता राज हिरेमठ (Savita Raj Hiremath) यांची आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या चित्रपटासाठी सविता राज हिरेमठ म्हणाल्या की, तिचा चित्रपट करमुक्त झाला नाही याचे मला आश्चर्य वाटते. तिच्या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, यासोबतच तिच्या चित्रपटाचा विषय आपल्या देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) नुकताच प्रदर्शित झालेला 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट देशभरातील अनेक राज्यांमध्ये करमुक्त (Tax free) करण्यात आला असताना सविताने ही प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सविता राज हिरेमठ यांनी नुकतंच फेसबकवर (facebook) एक पोस्ट शेअर करत म्हणाल्या

अर्थात 'द कश्मीर फाईल्स' हा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बनलेला चित्रपट आहे पण झुंड काही कमी नाही. ते म्हणाले की, "त्यांनी नुकतेच काश्मीरच्या फाइल्स पाहिले आहे. यात काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandit) संघर्षाची कहाणी दाखवली आहे, कहाणी खरंच खुप हृदयद्रावक आहे. हा काश्मिरी पंडितांसाठी चांगला आवाज आहे हा चित्रपट एक अशी कथा सांगतो जी सांगायची आहे. 'पण 'झुंड'ची निर्माती असल्याने तिला आश्चर्य वाटते की 'झुंड' हा देखील एक महत्त्वाचा चित्रपट आहे आणि त्याच्या कथेत एक मोठा संदेश आहे ज्याला प्रेक्षकांकडून प्रशंसा आणि दाद मिळत आहे.त्यामुळेच मला हे जाणून घ्यायचे आहे की सरकार एखादा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय नेमकं कोणत्या निकषावर घेते आहे.
४ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नागपुरातील Nagpur निवृत्त नाटक शिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांची भूमिका साकारली होती. झोपडपट्टी फुटबॉल (Football) चळवळीची जबाबदारी स्वीकारलेल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वावर हे पात्र चित्रित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर