मनोरंजन

Pushpa 2 Allu Arjun: जेलमध्ये रात्र काढल्यानंतर अखेर अल्लू अर्जुनची सुटका, पहिली प्रतिक्रिया समोर

पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका, पहिली प्रतिक्रिया दिली. चेंगराचेंगरी प्रकरणात अटक झाल्यानंतर अल्लू अर्जुनने चाहत्यांचे आभार मानले.

Published by : Team Lokshahi

अल्लू अर्जुनच्या पुष्पानं जोरदार धमाका केला होता. आता त्याचा सिक्वल पुष्पा 2 नं देखील बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. 5 डिसेंबरला रिलिज झालेल्या 'पुष्पा २' नं देशभरात तब्बल 164.25 कोटींचा गल्ला जमवत कमाईचे नवे रकॉर्ड तयार केले आहेत.

चित्रपटाच्या प्रदर्शित होताच त्यांच्या संबधीत अनेक घटना होत गेल्या ज्यामध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली. पुष्पा 2च्या अनुशंगानं सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीचं प्रकरण घडलेलं होतं आणि याच चेंगराचेंगरीच्या प्रकरणी कारवाई करण्यासाठी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली.

यादरम्यान जेलमध्ये रात्र काढल्यानंतर अखेर अल्लू अर्जुनची सुटका झाली त्याला जामीन मंजूर झाला आणि त्यावेळी त्याने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देत असताना अल्लू अर्जून म्हणाला की, मी झालेल्या घटनेबद्दल क्षमस्व आहे. गेले तीन चार वर्ष आम्ही प्रिमियरसाठी येत असतो पण कधी असा प्रकार घडला नाही, जी घटना झाली ती खरच दुर्दैवी होती.

मला त्या कुटुंबाबद्दल खरचं वाईट वाटत आहे. मी माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानतो कारण ते माझ्यावर एवढ प्रेम करतात. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि मी न्यायव्यवस्थेचा मान ठेवतो, त्याचा सन्मान करतो. असं म्हणत पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा