देशभरात पुष्पा-2 हा चित्रपट अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत होता अखेर काल तो रिलीज झाला. पुष्पा 2 चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ माजवला आहे. पुष्पा-2 या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 90.10 कोटींची कमाई केली असून जगभरात 400 कोटींची कमाई केली आहे. 2021मध्ये 'पुष्पा: द राइज' हिंदी आवृत्तीत प्रदर्शित झाला आणि त्यावेळेस या चित्रपटाने सलग तीन वर्ष आपली छाप सोडली त्यामध्ये अल्लू अर्जुनच वागण, बोलण, चालण इत्यादी लोक कॉपी करू लागले. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचे हिंदीमध्ये डबिंग श्रेयस तळपदेने होते. तसेच आता 5 डिसेंबरला जगभरात प्रदर्शित झालेला 'पुष्पा2: द रुल' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला देखील श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. यादरम्यान या चित्रपटात आवाजात दमदारपणा येण्यासाठी श्रेयस तळपदेला युक्ती सुचवावी लागली असं एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते.
मी सिनेमात काहीतरी व्हॅल्यू अॅड केली याचा मला आनंद आहे- श्रेयस तळपदे
मुलाखती दरम्यान श्रेयसने सांगितले की, हा चित्रपट इतका धुमाकूळ घालेलं अस मला वाटल नव्हत. सर्वांना चित्रपटाचे डबिंग करताना खूप मजा आली. हा चित्रपट इतका मजेदार होता की मी मध्येच मराठी बोलत होतो. श्रेयस मराठीमध्ये बोलत असताना पाहून डबिंग दिग्दर्शकाने त्याला सांगितले की, तो आतापासून चित्रपटात मराठी भाषेचाचा वापर करणार आहे. तिथून 'पुष्पा 2' च्या हिंदी आवृत्तीत मराठी भाषेचा देखील टच पाहायला मिळाला. तर पुढे श्रेयस म्हणाला की, पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा हे पात्र अधिक स्वॅग आणि डॅशिंग होते त्यामुळे त्याच्या अभिनयाला न्याय देण्यासाठी मला आवाजात दमदारपणा दाखवायचा होता 'मी राज्य करतोय' ही बाब दाखवून द्यायची होत , जो माझ्यासाठी थोडा अवघड होता. ज्यावेळेस मला अस वाटायचं की माझा आवाज जुळत नाही आहे त्यावेळी मी थांबत होतो आणि प्रत्येकी 2 तासांचे 14 सेशन करत होतो. पुष्पा हे पात्र चित्रपटात काही सीनमध्ये मद्यपान आणि सिगारेट ओढतोय त्यावेळी माझा आवाज जुळण्यासाठी मी तोंडात कापूस ठेवायचो आणि डायलॉग म्हणत होतो. मी सिनेमात काहीतरी व्हॅल्यू अॅड केली याचा मला आनंद आहे.
श्रेयस तळपदे पोस्टमध्ये काय म्हणाला आहे.
"फ्लॉवर नाही, आग है में पासून राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय है में! आम्ही खूप पुढे आलो आहोत. पुष्पा २ आठवडा अधिकृतपणे सुरू झाला आहे, आणि मी अधिक उत्साहित होऊ शकलो नाही! पुष्पा आणि माझ्या आवाजला तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे की मला पुन्हा डब करण्याची संधी मिळाली.. आणि बोलूया पुष्पा राज उर्फ अल्लू अर्जुन... किती ऊर्जा आहे! जेव्हा मी डब करतो तेव्हा तुमचा दमदार अभिनय मला नवीन ऊर्जा देतो. तुमचा स्वॅग, तुमचा आत्मविश्वास, तुमची देहबोली आणि तरीही तुमची अगतिकता कमीतकमी सांगण्यासाठी प्रेरणादायी आहे. माझा अनुभव आनंदी, मजेदार आणि रोमांचक बनवल्याबद्दल मानव भाई, राज, वीरू, सनी आणि संपूर्ण डबिंग टीमचे आभार. तुमची मेहनत स्क्रीनवर दिसते. शेवटी, आपण सर्व अद्भुत प्रेक्षकांनी ते पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. आपले विचार सामायिक करा!"