मनोरंजन

Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जूनच्या वाढदिवसाच्या खासप्रसंगी पुष्पा 2 चा टीझर चाहत्यांसाठी प्रदर्शित

आज साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जून त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नवीन चित्रपट पुष्पा 2 चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

आज साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जून त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नवीन चित्रपट पुष्पा 2 चा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये अल्लू पुन्हा एकदा पुष्पा राजच्या भूमिकेतून चाहत्यांची मने जिंकत आहे. 'पुष्पा 2: द रुल' चा टीझर इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. या टीझरमध्ये अभिनेता खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

पुष्पाच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या सीनमध्ये पुष्पा-श्रीवल्लीचे लग्न आणि त्याआधी शेखावत (फहाद फाजिल) सोबतचे शब्दयुद्ध पाहायला मिळाले होते, जे आता सिक्वेलमध्ये बदलाच्या आगीत बदलत असल्याचे दिसते. 'पुष्पा 2: द रुल' च्या टीझरमध्येही, निर्मात्यांनी अल्लू अर्जुनचा खूप वेगळा अवतार दाखवला आहे.

पुष्पा 2: द रुल'च्या टीझरमध्ये अभिनेत्याने विविध भरजरी दागिने, साडी नेसून, गळ्यात लिंबाची माळ, हारतुरे, कानात मोठे झुमके, पायात घुंगरू आणि डोळ्यात काजळ आहे. याशिवाय यावेळी पुष्पा राजचा लूकही खूप बदलला आहे. टीझरमध्ये अभिनेता साडी नेसून हातात त्रिशूळ घेऊन शत्रूंशी लढताना दिसत आहे. चित्रपटाचा हा रोमांचक टीझर चाहत्यांना आनंद देत आहे. पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."