Pushpa 2 
मनोरंजन

‘पुष्पा २: द रूल’ने प्रस्थापित केला नवा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. जगभरातील कलेक्शन मिळून या चित्रपटाने १५०० कोटींचा टप्पा गाठला आहे.

Published by : Team Lokshahi

सुपरस्टार अल्लू अर्जुन चा ‘पुष्पा २: द रूल’ बॉक्स ऑफिसवर थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट दररोज कोट्यवधींची छप्पर फाड कमाई करत आहे. देशातच नाही तर परदेशातही हा चित्रपट तुफान गाजत आहे. आता ‘पुष्पा २: द रूल’ या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जगभरातील कलेक्शन मिळून या चित्रपटाने १५०० कोटींचा टप्पा गाठला आहे.

‘पुष्पा २: द रूल’ च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनचा आकडा जाहीर केला आहे. ‘पुष्पा २: द रूल’ या चित्रपटाच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने आतापर्यंत १५०८ कोटींचं ग्रोस कलेक्शन केलं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.

सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर अमिर खानचा चित्रपट 'दंगल'ने बॉक्स ऑफिसवर २००० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या क्रमांकावर बाहुबली चित्रपट आहे. बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १७८८ कोटींची कमाई केली होती. आणि आता तिसऱ्या क्रमांकावर अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट आहे.

साल २०२४ या वर्षातील सर्वात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला ‘पुष्पा २: द रूल’

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट २०२४ या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केलं आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना, फहद फाजिल और जगपति बाबू या कलाकारांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...