मनोरंजन

R. Madhavan: आर माधवनने मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क...

आर माधवनने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने चाहतावर्ग वाढवला. आर माधवनने मुंबईत आलिशान घर घेतल आहे. आर माधवनने घेतलेल्या घराचे फोटो समोर आले आहेत

Published by : Team Lokshahi

आर माधवनने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने चाहतावर्ग वाढवला आणि नुकताच तो शैतान या चित्रपटात अजय देवगनसह दिसून आला, या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली असून त्याच्या भूमिकेला चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव पडला. 'रहना है तेरे दिल में' या चित्रपटासह त्याने आपली मॅडी ही ओळख चाहत्यांसमोर आणली. अशा आर माधवनने मुंबईत आलिशान घर घेतल आहे. मुंबईतील बीकेसी या परिसरात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील 'Signia Pearl' या इमारतीत 4 आणि 5 बीएचकेमध्ये आलिशान फ्लॅट घेतला आहे.

आर माधवनने घेतलेल्या घराचे फोटो समोर आले आहेत यावरून या फ्लॅटचा इंटेरियर आकर्षक आणि ,सुंदर असल्याचं दिसत आहे. तर आर माधवनने ही डील 22 जुलै रोजी फायनल केली होती आणि या डीलसाठी माधवनने 1.05 कोटी स्टॅम्प ड्युटी भरली होती. ३० हजार रजिस्ट्रेशन फी असलेल्या या आलिशान फ्लॅटची एकूण किंमत 17.5 कोटी आहे. बीकेसी हे मुंबईतील लोकप्रिय आणि पॉश परिसर म्हणून ओळखले जाते. बीकेसी या परिसरात राहणाऱ्या लोकांचे राहणीमान हे लक्झरि आणि उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे आर माधवनला या घरासाठी मोठी रक्कम मोजावी लागली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today :सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश