मनोरंजन

अभिमानास्पद! आर माधवनच्या मुलाने वाढवली देशाची शान; जिंकली 5 सुवर्णपदके

माधवनचा मुलगा चित्रपटसृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचे नाव रोशन करत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रसिध्द अभिनेता आर माधवनने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. माधवनचा मुलगा चित्रपटसृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचे नाव रोशन करत आहे. वेदांतने जलतरण स्पर्धेत भारतासाठी पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. या यशाबद्दल चाहते आर माधवनच्या मुलाचे अभिनंदन करत आहेत.

आर माधवनने आपल्या मुलाचे अभिनंदन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये वेदांत भारताचा राष्ट्रध्वज आणि पाच सुवर्ण पदकांसह पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो त्याची आई सरिता बिर्जेसोबत दिसत आहे.

भारतासाठी पाच सुवर्णांसह वेदांतला (५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर आणि १५०० मीटर) दोन पीबी मिळाले. हा कार्यक्रम या आठवड्यात क्वालालंपूर येथे मलेशिया इनव्हिटेशनल एज ग्रुप जलतरण चॅम्पियनशिप 2023 मध्ये आयोजित करण्यात आला होता. आम्ही उत्साहित आहोत आणि प्रदीप सरांचे खूप आभारी आहोत, असे माधवनने पोस्टमध्ये लिहीले आहे. या यशाबद्दल चाहते आर माधवनच्या मुलाचे अभिनंदन करत आहेत.

दरम्यान, आर माधवनने त्याच्या कामासह कुटुंबाला पूर्ण वेळ देतो. मुलगा वेदांत व्यतिरिक्त तो सोशल मीडियावर कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटो शेअर करत असतो. त्यांच्या साध्या राहणीचे सर्वजण कौतुक करतात. कामाच्या आघाडीवर, माधवन नुकताच 'रॉकेटरी' आणि 'धोखा' या चित्रपटांमध्ये दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटांची यादीही खूप मोठी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका