मनोरंजन

RADHE SHYAM | कृष्णा जन्माष्टमीच्या निमित्ताने चाहत्यांना पोस्टरद्वारे झलक..

Published by : Lokshahi News

राधे श्यामचा (RADHE SHYAM) पोस्टर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी कृष्णा जन्माष्टमीच्या निमित्तसाधून चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टरमध्ये पूजा हेगडे बॉल गाऊनमध्ये राजकुमारीसारखी दिसत आहे. कदाचित परीकथा असल्याचे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

राधे श्याम हा भारतीय काळातील रोमॅन्टिक चित्रपट (Romance movie) आहे. राधा कृष्ण कुमार (radha krishn kumar) हे लिखित आणि दिग्दर्शित आहे, प्रभास ( PRABHAS ) आणि पूजा हेगडे (POOJA HEGDE) यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तेलुगु आणि हिंदी भाषांमध्ये एकाच वेळी करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती यूव्ही क्रिएशन्स (UV CREATION) आणि टी-सीरिज (T-Series) यांनी केली आहे. या चित्रपटाचे संगीत निर्माते जस्टिन प्रभाकरन (Justin Prabhakaran) यांनी केले आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले.

प्रभासने हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले, "जन्माष्टमी साजरी करा या भव्य पोस्टराने", #राधे श्याम."

राधे श्याममध्ये सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री आणि कुणाल रॉय कपूर देखील आहेत. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित, बहुभाषिक प्रेमकथा मकर संक्रांती 2022 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

दरम्यान, अभिनेत्याने अलीकडेच जाहीर केले की बहुप्रतिक्षित चित्रपट "सलार" (Salaar) 14 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात दाखल होईल.प्रभासने अभिनेत्री दीपिका पदुकोण 'मुहूरत' (MUHURAT) या चित्रपटात एकत्र पाहायला मिळतील. याचे दिग्दर्शन "महंती" (Mahanati) दिग्दर्शक अश्विन नाग (Ashwin Nag) करणार आहे.

लोकसभेत का जायचंय? बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाल्या; "खासदार झाल्यावर..."

Daily Horoscope 12 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे आर्थिक समस्या दूर होतील; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 12 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"कौरवांच्या विरोधात आमची पांडव सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरले" पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

GT vs CSK : शुबमन गिलच्या नावावर 'या' जबरदस्त विक्रमाची नोंद, अहमदाबादच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस