मनोरंजन

Radhika Apte Pregnancy : राधिका आप्टे होणार आई! एका फेस्टिव्हल दरम्यान फ्लॉन्ट केला बेबी बंप...

गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आई झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आप्टे हिने देखील नुकतीच ती आई होणार असल्याची बातमी दिली आहे.

Published by : Team Lokshahi

गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आई झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतून गेले काही महिने गुडन्यूज ऐकायला मिळत आहे. अशातच मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आप्टे हिने देखील नुकतीच ती आई होणार असल्याची बातमी दिली आहे. राधिकाने मराठी, हिंदी सिनेमे तसेच वेब सीरिज आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील झकळकली आहे. राधिका 2012मध्ये ब्रिटीश लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली.

तिने तिचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवल्यामुळे अनेक लोकांना तिच्या प्रेग्नन्सीची बातमी जाणून धक्का बसल्याच तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये कमेंटद्वारे दिसत आहे. आता राधिका लग्नाच्या तब्बल 12 वर्षांनंतर आई होणार आहे. 16 ऑक्टोबरला झालेल्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिस्टर मिडनाइट चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अभिनेत्री गेली होती. यादरम्यान रेड कार्पेटवर तिने बेबी बंप फ्लॉन्ट करताना काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात तिने एक सुंदर ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे.

या पोस्टवर तिने "सिस्टर मिडनाइट यूके प्रीमियर" असे कॅप्शन दिले आहे. याआधी राधिकाने इतर कलाकारांप्रमाणे तिच्या प्रेग्नन्सीबद्दलची कोणतीच पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली नव्हती त्यामुळे याबद्दल कोणालाच माहिती नव्हती मात्र आता राधिकाचे हे बेबी बंप फोटो पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिच्या या पोस्टवर आणि या गुडन्युजसाठी सिनेसृष्टीतून तसेच चाहत्यांकडून शुभेच्छा आणि कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?