मनोरंजन

रशीया आणि यूक्रेनच्या युध्दामुळे राहुल महाजनची पत्नी नतालिया इलिना झाली इोमशनल

Published by : Team Lokshahi

सध्या रशीया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) मध्ये युध्द सुरु आहे. ह्यामुळे तिसऱ्या महायुध्दाचे संकट वाढत आहे. ह्या दरम्यान सर्व सेलिब्रेटी याविरोधात आवाज उठवत आहेत. तसेच बीग बॉस फेम राहुल महाजनची पत्नी नतालिया इलिनेही (Natalya Ilina) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ह्या पोस्टमध्ये आपली व्यथा मांडताना तिने तिचे रशीया आणि यूक्रेनशी असलेले सखोल नाते सांगितले आहे. यासोबत तीचे कुंटुबीय आणि मित्रमंडळ तेथे राहत असल्याचं सांगितलं आहे.

नतालियाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीले की, माझी आजी रशीयन होती माझे आजोबा जर्मन (german) होते. तसेच माझ्या आईची आई यूक्रेनियन आणि वडील रशियन होते. आता रशीयाला यूक्रेनच्या विरोधात पाहुन अस वाटत आहे की आपल्या कुंटुबीयांना आपल्याच कुंटुबीयांशी युध्द करायला सांगितले जात आहे. हे सर्व पाहुन माझ्या ह्रदयाचे तुकडे झाले आहे. ह्या परीस्थितीला पाहुन मी खुप चिंतीत आहे. मी रोज बातम्या बघते तसेच यूक्रेनमध्ये राहत असलेल्या माझ्या मित्रांसोबत बोलत असते. मी कोणाची बाजू घेउ शकत नाही. ह्यावेळेस मी मानवतेच्या बाजूने आहे. मी रशीयन आहे आणि यूक्रेनियनही तसेच जर्मन सुध्दा आहे. मी शांती आणि नो वॉरची प्रार्थना करत आहे. नतालिया सोबतच अजुन अनेक लोकांनी हे युध्द थांबवण्याचे अहवान केले आहे.
नतालिया एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. 2016 मध्ये रीलीज झालेल्या 'मुरारी द मॅड जेमटलमॅन' (Murari the Mad Gemtleman) ह्या बॉलिवूड चित्रपटामध्ये ती दिसली होती. एका मंदिरा मध्ये राहुल महाजन (Rahul mahajan) आणि नतालिया इलिनाच 2018 मध्ये लग्न झाल होते. तसेच नतालिया राहुल महाजनची तिसरी पत्नी आहे. राहुलने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की नतालियाने लग्नानंतर हिंदु धर्म स्विकारला आहे. लवकरच दोघेही स्टार प्लसच्या स्मार्ट जोडी या शो मध्ये दिसणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा