मनोरंजन

Raj Kundra | राज कुंद्राच्या वेब सीरीजसाठी नग्न ऑडिशनची मागणी

Published by : Lokshahi News

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने रात्री 11 वाजता त्याला मुंबईत बेड्या ठोकल्या. या प्रकरणी अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपला अनुभव देखील सांगितला आहे.

"मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने केला आहे.या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा