Jyoti Chandekar : ज्योती चांदेकरांच्या अंत्यसंस्कारवेळी 'या' बड्या नेत्यांची उपस्थिती, वाहली श्रद्धांजली Jyoti Chandekar : ज्योती चांदेकरांच्या अंत्यसंस्कारवेळी 'या' बड्या नेत्यांची उपस्थिती, वाहली श्रद्धांजली
मनोरंजन

Jyoti Chandekar : ज्योती चांदेकरांच्या अंत्यसंस्कारवेळी 'या' बड्या नेत्यांची उपस्थिती, वाहली श्रद्धांजली

श्रद्धांजली: ज्योती चांदेकरांच्या अंत्यसंस्कारावेळी राज ठाकरे उपस्थित, मराठी कलाविश्वात शोककळा.

Published by : Riddhi Vanne

Raj Thackeray paid tributes to Actress Jyoti Chandekar : मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे काल शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 69 वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी त्यांची मुलगी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने अंत्यसंस्कार केले आहेत. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी अतिशय भावूक झाली तिचे अश्रु अनावर झाले, त्यानंतर तेजस्वीनीने एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्योती चांदेकरांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

ज्योती चांदेकरांच्या कामाविषयी सांगण्याचे झाले तर, 1969 मध्ये ज्योती एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग पाहायला गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शकाने लहान मुलींची गरज असल्याचं सांगून काही मुलींना बोलावलं. त्यावेळी ज्योती यांनी काही हिंदी संवाद वाचून दाखवले आणि दिग्दर्शकांच्या पसंतीस उतरल्या. त्यातूनच त्यांची पहिली हिंदी चित्रपटात भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांना ‘सुंदर मी होणार’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या नंतर त्यांनी अनेक गाजलेली नाटकं केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा