मनोरंजन

‘घटस्फोटानंतर कोलमडून गेलो होतो’राकेश बापटने सांगितल्या मनातील गोष्टी

Published by : Lokshahi News

बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा 'बिग बॉस ओटीटी'हा शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी सहभागी झाली आहे. शमिता आणि बिग बॉस ओटीटीच्या घरातील स्पर्धक अभिनेता राकेश बापट सध्या चर्चेत आहेत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान राकेशने त्याच्या खासगी आयुष्याविषयी वक्तव्य केले आहे.

बिग बॉस ओटीटीच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कदरम्यान शमिता आणि राकेश यांच्यामध्ये गैरसमज झाले. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद देखील झाल्याचे पाहायला मिळाले. पण नंतर गार्डन एरिआमध्ये बसून त्या दोघांनी गैरसमज दूर केले. दरम्यान राकेशने शमिताला त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या.

राकेशने पत्नी रिद्धि डोगराला घटस्फोट देणे आणि त्यानंतर वडिलांचे निधन या दोन घटनानंतर पूर्णपणे कोलमडून गेल्याचे शमिताला सांगितले. पण राकेशने स्वत:ला आणि कुटुंबीयांना सांभाळले असे म्हटले. लहानपणापासून त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे देखील राकेशने म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत