मनोरंजन

बिगबॉस मराठीत राखी सावंतचा गोंधळ; स्नेहलताला थंड पाण्यात बुडवले

जिथे जाईन तिथे आपली छाप सोडणं, अशी राखी सावंतची ओळख आहे. बिग बॉस आणि आणि राखी असं समीकरण झालेलं आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री राखी सावंत काही दिवसांपूर्वी वाईल्ड कार्ड एंट्रीने बिगबॉसच्या घरात प्रवेश केला आहे. तिथेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्वतःच नाव कमावलेली मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिनेही एका महिन्यापूर्वी वाईल्ड कार्डने बिगबॉसच्या घरात प्रवेश केलेला आहे. राखीच्या प्रवेशानंतर लगेच या दोघींमध्ये खटके उडत आहेत.

जिथे जाईन तिथे आपली छाप सोडणं, अशी राखी सावंतची ओळख आहे. बिग बॉस आणि आणि राखी असं समीकरण झालेलं आहे. आता यावेळेस तर चक्क मराठी बिगबॉस मध्ये राखीची एंट्री झालीय. यावेळेस मराठीत का असेना पण ड्रामा क्विन बिगबॉसच्या घरातुन चर्चेत आली आहे. ती घरातील सदस्यांकडून कामे करून घेत आहे, आणि बिगबॉसचा आवाज बनून त्यांना शिक्षाही करत आहे.

नुकताच राखीच्या टीमने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला त्यात दिसत आहे कि राखी स्नेहलताला थंड पाण्यात बुडण्यास सांगत आहे. व्हिडिओप्रमाणे स्नेहलता नेहमीच गळ्यात माइक परिधान करायला विसरते. या गोष्टीवरून बिगबॉसने तिला अनेकवेळा समज दिली. आणि याच गोष्टीचा फायदा घेत राखीने स्नेहलताला ही शिक्षा दिलीय. व्हिडिओत दिसत आहे कि स्नेहलता विनामाईक भांडी साफ करताना दिसते. त्यारून बिगबॉस तिला माईक परिधान करण्याची सूचना करतात. ही सूचना ऐकून स्नेहलता माईक घ्यायला धावते तितक्यात राखीमध्ये येऊन बोलते कि हे प्रत्येकवेळी नाही चालणार. तुला जेव्हा काही शिक्षा मिळेल तेव्हाच तुझ्या लक्षात राहीन.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा