मनोरंजन

Raksha Bandhan 2021 Wishes : बॉलिवूड कलाकारांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Published by : Lokshahi News

रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा खास सण. प्रत्येकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावंडांना शुभेच्छा देत आहे. बॉलिवूड सेलेब्स देखील रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांचे भाऊ आणि बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन, झोया अख्तर, अंशुला कपूर, रिद्धिमा कपूर साहनीसह अनेक सेलेब्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या राय बच्चननं बराच काळ सोशल मीडियापासून अंतर ठेवलं होतं. रक्षाबंधनाच्या खास निमित्तानं तिने तिचे फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं – आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आपल्या भावंडांसोबत वेळ घालवा आणि काही खास आठवणी बनवा.

रिद्धिमा कपूर साहनी (Ridhima Kapoor)
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीनंही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. तिने आई नीतू कपूर आणि भाऊ रणबीरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत रिद्धिमाने लिहिले – राखीची शुभेच्छा . भरपूर प्रेम.

एकता कपूर (Ekta Kapoor)
प्रोड्युसर एकता कपूरनंही मुलगा रविच्या राखीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं – चुलत बहीण दियासोबत रविची राखी.

धर्मेंद्र (Dharmendra)
धर्मेंद्र यांनी एक महिलेनं सैनिकाला राखी बांधल्याचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले – रक्षाबंधनाच्या शुभेच्छा .. हा सण कोणत्याही पूजेपेक्षा कमी नाही

झोया अख्तर (Zoya Akhtar)
झोया अख्तरनेही भाऊ फरहानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिलं – फरहान आणि मी. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

जेनिलीया देशमुख
झोया अख्तरनेही भावासोबत एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा