Rakul Preet Singh
Rakul Preet Singh  Team Lokshahi
मनोरंजन

Rakul Preet Singh : ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी रकुलप्रीत सिंगची पुन्हा चौकशी

Published by : shweta walge

टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. रकुल प्रीत १९ डिसेंबरला ईडीसमोर हजर होणार आहे. यापूर्वी ईडीने याप्रकरणी तेलगू चित्रपटातील अनेक कलाकारांची चौकशी केली आहे. याप्रकरणी २०२१ मध्येही रकुल प्रीतची चौकशी करण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी राणा दग्गुबती, तेजा, पुरी जगन्नाथ यांनाही टॉलिवूडमधून बोलावण्यात आले आहे.

रकुल प्रीत सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आगामी काळात 'छत्रीवाली' या महिला केंद्रित चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म G5 वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा एका छोट्या गावातल्या एका मुलीभोवती फिरताना दिसणार आहे, जी नोकरी न मिळाल्याने निराश होऊन कंडोम टेस्टर बनते. मिळालेल्या माहितीनुसार, रकुल प्रीत सिंहने या चित्रपटात हरियाणाच्या कर्नालमध्ये राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. तेजस विजय देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटात रकुल प्रीत सिंह व्यतिरिक्त सुमित व्यास, प्राची शाह, सतीश कौशिक आणि डॉली अहलुवालिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

रकुल प्रीत सिंग अखेरची 'थँक गॉड' चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास दाखवू शकला नाही. रकुल प्रीत सिंगने साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत एक खास ओळख निर्माण केली आहे. रकुल आजकाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बातम्यांनुसार, 2023 मध्ये रकुल प्रीत तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लग्न करणार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...