RAM CHARAN’S MASSIVE BODY TRANSFORMATION FOR ‘PEDDHI’ STUNS FANS AHEAD OF 2026 RELEASE 
मनोरंजन

Ram Charan: राम चरणचा जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन समोर, ‘पेड्डी’मुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Body Transformation: राम चरणचा ‘पेड्डी’साठीचा जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Published by : Dhanshree Shintre

राम चरणचा जबरदस्त फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘पेड्डी’ या आगामी चित्रपटासाठी त्यांनी केलेली मेहनत पाहून चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी राम चरणचे नवे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर एक्साइटमेंट आणखी वाढली आहे.

२०० मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि २० लाखांपेक्षा जास्त लाईक्ससह ‘पेड्डी’ जगभरातील चाहत्यांची फेव्हरेट ठरली असून, २०२५ मधील सर्वाधिक ट्रेंड होणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून ती उदयास आली आहे.

शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये राम चरण आपल्या भूमिकेच्या तयारीत पूर्णपणे झोकून देताना दिसत आहेत. शर्टलेस वर्कआउट करतानाचे हे फोटो त्यांच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची झलक दाखवतात. त्यांच्या फिटनेसवरूनच हा रोल किती इंटेन्स आणि दमदार असणार आहे, याचा अंदाज येतो.

आपल्या डेडिकेशन आणि इमर्सिव्ह अभिनयासाठी ओळखले जाणारे राम चरण ‘पेड्डी’साठी कोणतीही कसर सोडत नाहीत. त्यांचा इंटेन्स लूक आणि कमालीची फिटनेस या फोटोंमध्ये स्पष्ट दिसते, जी त्यांच्या पात्रासाठी लागणारी शिस्त, ताकद आणि खोली दाखवते.

बुच्ची बाबू सना यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘पेड्डी’मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटात त्याच्यासोबत शिवा राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

वेंकट सतीश किलारू यांच्या ‘वृद्धी सिनेमाज्’ बॅनरखाली, मायथ्री मूव्ही मेकर्सच्या सहकार्याने हा चित्रपट तयार होत असून, ‘पेड्डी’ २७ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा