Ram Charan Team Lokshahi
मनोरंजन

KGF 2 च्या यशावर RRR स्टारर राम चरण म्हणाला...

RRR स्टारर राम चरणने KGF 2 बद्दल आणि यशच्या अॅक्टींगबाबत मोठ वक्तव्य केले आहे.

Published by : Team Lokshahi

प्रशांत नील दिग्दर्शित KGF 2 या चित्रपटाने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता खुप वाढली आहे. KGF 2 बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. अशातच RRR स्टार राम चरणने (Ram Charan) KGF 2 बद्दल आपले मत व्यक्त करत सर्व टीमचे कौतुक केले आहे.

रामचरणने आपल्या इंस्टाग्राम पेजवर KGF 2 चे पोस्टर शेअर केले आहे. त्याचबरोबर यशच्या कामाबद्दल कौतुक देखील केलेलं आहे. यशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर जेवढं कौतूक करावं तेवढं कमीच आहे असं तो म्हणाला.

अभिनेता संजय दत्त (sanjay datt) यांचा परफॉर्मन्स अगदी मनाला भावणारा आहे. रविना टंडन (Raveena tandon) चा अगदी शानदार परफॉर्मन्स असून त्यांचे काम पाहून मला खूप छान वाटलं असं त्यांनी सांगितलं आहे.

याआधी बाहुबली स्टार प्रभास (Prabhas) यांनी देखील KGF 2 च्या टीमचे कौतुक केले होते. आपल्या इन्स्टाग्राम पेजवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने टीमला शुभेच्छा दिल्या होत्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा