Ram Setu Box office collection Day 1
Ram Setu Box office collection Day 1 Team Lokshahi News
मनोरंजन

अक्षय कुमारचा 'राम सेतू' बॉक्स ऑफिसवर पडला फिका; 'एवढे' केले कलेक्शन

Published by : Pankaj Prabhakar Rane

चाहत्यांना दिवाळीचं गिफ्ट देणारा अभिनेता अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट मंगळवारी 25 ऑक्टोबरला रिलीज झाला. या चित्रपटात अक्षय कुमारसह जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. आता मात्र हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे.

पहिल्या दिवशी या चित्रपटानं 15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. हा चित्रपट जवळपास 3000 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. काही चित्रपट समीक्षकांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. पण बॉक्स ऑफिसवर राम सेतूची सुरुवात संथ झाली.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं. अभिषेक शर्मा यांनी यापूर्वी 2020 मध्ये आलेल्या 'सूरज पर मंगल भारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांझ आणि फातिमा सना शेख या कलारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही.

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी