मनोरंजन

'अ‍ॅनिमल'चा ट्रेलर रिलीज; रणबीर कपूरच्या गॅंगस्टर लुकची चर्चा

मोस्ट अवेटेड रणबीर कपूर स्टारर चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी 28 सप्टेंबरला म्हणजेच रणबीर कपूरच्या वाढदिवसाला 'अ‍ॅनिमल' चा ट्रेलर रिलीज केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मोस्ट अवेटेड रणबीर कपूर स्टारर चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी 28 सप्टेंबरला म्हणजेच रणबीर कपूरच्या वाढदिवसाला 'अ‍ॅनिमल' चा ट्रेलर रिलीज केला आहे. या धमाकेदार ट्रेलरमध्ये रणबीर कपूर अ‍ॅक्शन सीन्समध्ये दिसत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला अनिल कपूर रणबीर कपूरच्या चेहऱ्यावर थप्पड मारताना दिसत आहे आणि ज्योती म्हणतो, आपण एक गुन्हेगार तयार केला आहे. यानंतर रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना दिसतात आणि रणबीर रश्मिकाला सांगतो की, माझे वडील जगातील सर्वोत्तम वडील आहेत. यानंतर रणबीरचा इंटेन्स लूक पाहायला मिळतो आणि अ‍ॅक्शन सीन्सही पाहायला मिळतात. ट्रेलरच्या शेवटच्या भागात बॉबी देओल दिसत असून त्याच्या एंट्रीने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहे.

एक गँगस्टर ड्रामा मानल्या जाणाऱ्या या मनोरंजक चित्रपटात रणबीर मुख्य भूमिकेत आहे, ज्याची कथा वडील आणि मुलाच्या ताणलेल्या नात्यावर केंद्रित आहे. अनिल कपूर 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट आधी ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. नंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या 'गदर 2' आणि अक्षय कुमार स्टारर 'OMG 2' सोबत टक्कर देत होता. हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी रिलीजची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."