Ranbir Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : वर्गमित्र भेटताच रणबीरने केला 'हा' खुलासा...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या सतत काही ना काही कारणावरून चर्चित असतो.-

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या सतत काही ना काही कारणावरून चर्चित असतो. एकीकडे रणबीर लवकरच पिता होणार आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरचा आगामी शमशेरा हा चित्रपट सतत चर्चेत असतो. रणबीर सध्या शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान या अभिनेत्याने एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlanee) सोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

खरं तर रणबीर कपूर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'संडे विथ स्टार परिवार' या टीव्ही शोमध्ये पोहोचला होता. वाणी कपूरही (Vani Kapoor) रणबीरसोबत शोमध्ये पोहोचली होती.

शोमध्ये पोहोचल्यावर रणबीर आणि शोचा होस्ट अर्जुन बिजलानी यांनीही खूप धमाल केली. दरम्यान रणबीर कपूरने खुलासा केला की टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी हा त्याचा वर्ग आहे. रणबीर कपूर म्हणाला की लोकांना हे कदाचित माहित नसेल की आम्ही एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आम्ही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात होतो. एवढच नव्हे तर आम्ही फुटबॉलच्या एकाच टीम मध्ये होतो. अभिनेत्याने पुढे सांगितलं की, जेव्हा आपण आपल्या शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी भेटतो तेव्हा खूपच छान वाटतं. तीच जुनी ऊर्जा आणि तोच आनंद पुन्हा नव्याने अनुभवण्यास मिळतो. रणबीरने पुढे अर्जुनचे कौतुक केले आणि तू एक चांगला पिता आणि एक अद्भुत होस्ट आहेस असं देखील सांगितलं… तुझे हे दोन्ही काम पाहून मन खूप आनंदी होते. त्याचवेळी अर्जुननेही हसून उत्तर दिले धन्यवाद यार.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा