Ranbir Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : आपल्या वडिलांबद्दल रणबीरने केला खुलासा...

वडील ऋषी कपूर सांगायचे की रणबीर ज्याप्रकारचे चित्रपट करतो त्याद्वारे तो कधीही नॅशनल स्टार बनू शकत नाही.

Published by : prashantpawar1

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ह्याने त्याच्या आगामी 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक मनोरंजक मार्ग काढला आहे. रणबीरने YRF च्या सहकार्याने 'RK Tapes' नावाची 3 भागांची मालिका रिलीज केली आहे. या मालिकेच्या एका एपिसोडमध्ये रणबीरने सांगितले की त्याचे वडील ऋषी कपूर (Hrishi Kapoor) सांगायचे की रणबीर ज्याप्रकारचे चित्रपट करतो त्याद्वारे तो कधीही नॅशनल स्टार बनू शकत नाही. त्याचबरोबर मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये रणबीरने चित्रपटांमधील आवडत्या कलाकारांबद्दल देखील सांगितले आहे. मालिकेच्या दुसऱ्या भागात रणबीर म्हणाला की मी लहान होतो तेव्हा मला अमिताभ बच्चनसारखे बनायचे होते आणि जेव्हा मी मोठे झालो तेव्हा मला शाहरुखसारखे व्हायचे होते. मी जे काही बोललो त्यात माझ्या आवडत्या कलाकारांची झलक दिसली. ती माझ्या कपड्यांची पद्धत किंवा शैली आहे.

तो पुढे म्हणाला की माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी तेच चित्रपट निवडायचो जे माझे आवडते कलाकार त्यात काम करत असत. मला आठवतं की माझे वडील मला सांगायचे की मी जे चित्रपट करतो ते चांगले आहेत परंतु त्यांच्याकडून असं देखील काहीवेळा सांगण्यात आलं की असे चित्रपट केल्याने मी नॅशनल दर्जाला जाऊ शकणार नाही. कृतज्ञतापूर्वक माझे चित्रपट प्रेक्षकांना आवडायचे पण मला समजले की त्यांना नक्की काय म्हणायचे होते. या दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये रणबीर म्हणाला की आजही जेव्हा मी माझ्या आवडत्या अभिनेत्यांकडे पाहतो तेव्हा मी त्यांच्याकडे नेहमी शैलीबद्दल जाणून घेऊ पाहतो.

मी स्वत:ला त्यांच्या बरोबरीने कधीच पाहत नाही. चित्रपटाच्या प्रमोशनच्या तिसर्‍या भागात रणबीर खलनायकांबद्दलही बोलले. या चित्रपटात खलनायकापेक्षा नायकाची भूमिका अधिक असल्याचे ते म्हणाले. कारण नायकाला आपली वीरता दाखवण्यासाठी चित्रपटात खलनायक असावा लागतो. कारण खलनायक नसेल तर नायक नायक कसा होणार. आपल्या चित्रपटसृष्टीत असे अनेक खलनायक आहेत ज्यांनी नायकांनाही अभिनयाच्या बाबतीत मागे टाकले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद