Ranbir Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : चित्रपटासाठी रणबीर घेतो एवढं मानधन...

रणबीर कपूरच्या कमाईचे मुख्य साधन म्हणजे त्याचे चित्रपट आणि जाहिराती.

Published by : prashantpawar1

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्याबद्दल बोलायचं झालं तर रणवीर हा नेहमीच काही ना काही कारणावरून चर्चित असतो. मागील शुक्रवारी त्याचा 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांमध्ये खूप कौतुक होत आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. रणबीरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूर हा चित्रपटातून मोठी कमाई करतो. याव्यतिरिक्त जाहिरातींमध्ये देखील त्याचा मोठा दबदबा आहे. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

रणबीर कपूरच्या कमाईचे मुख्य साधन म्हणजे त्याचे चित्रपट आणि जाहिराती. मीडिया रिपोर्ट्सनुसार तो प्रत्येक चित्रपटासाठी 20 ते 25 कोटी इतकं तगडं मानधन घेतो. याचबरोबर जाहिराती हा त्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. Canknowledge च्या रिपोर्टनुसार रणबीर कपूरची एकूण संपत्ती ही 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. रणबीर एका महिन्यात तीन कोटींहून अधिक कमावतो.

यासोबतच त्याचे मुंबईत एक घर आहे. ज्याचं इंटीरियर डिझायनिंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने केलेलं आहे. रणबीरच्या घराची किंमत जवळपास 16 कोटी एवढी आहे. यासोबतच तो मुंबई सिटी एफसी या फुटबॉल संघाचा सह-मालकही आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?