मनोरंजन

रणबीर कपूर-संजय दत्तचा ‘हा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार

Published by : Lokshahi News

रणबीर कपूर बऱ्याच काळानंतर मोठ्या पदड्यावर परतला असून तो लवकरच शराज बॅनरच्या 'शमशेरा'मध्ये दिसणार आहे. यावर्षी 18 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता असे म्हटले जात आहे की, कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता चित्रपट निर्मात्यांनी 'शमशेरा' डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची योजना आखली आहे.

दरम्यान, नुकत्याच आलेल्या एका अहवालात, 'शमशेरा' बद्दल असा दावा करण्यात आला होता की, चित्रपटाचे थिएटरनंतरचे डिजिटल अधिकार ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने विकत घेतले आहेत. म्हणजेच, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. याशिवाय या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क स्टार नेटवर्कला विकले गेले आहेत. चित्रपटाचे नाट्य आणि संगीत हक्क यशराज फिल्म्सकडे आहेत.

दिग्दर्शक करण मल्होत्रा डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'शमशेरा' रिलीज करण्याबाबत बोलताना म्हणाले की, या सर्व गोष्टी पूर्णपणे निर्मात्याच्या हातात आहेत. तो माझ्या आयुष्यातील सर्वात सक्रिय निर्माता आहे. त्यांना याबद्दल चांगली माहित आहे आणि मी ते पूर्णपणे त्यांच्यावर सोडले आहे.'करण मल्होत्रा यांनी पुढे सांगितले की, 'हा चित्रपट मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनतीने बनवला आहे. याशिवाय मी चित्रपटाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आता सर्वकाही आदित्यवर अवलंबून आहे. त्याला ते कसे ठेवायचे आहे, त्याची योजना काय आहे, सर्वकाही त्याच्या हातात आहे. मी दिग्दर्शक म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आहे. त्याचबरोबर करणनेही चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा अशी इच्छाही व्यक्त केली. त्याने पुढे सांगितले की, शमशेराबद्दल काहीही बोलणे घाईचे आहे, कारण सध्या आपण अशा परिस्थितीत आहोत, ज्यामुळे संपूर्ण वातावरण नकारात्मक झाले आहे. आम्ही अद्याप चित्रपटाच्या पीआर झोनमध्ये प्रवेश केलेला नाही, परंतु योग्य वेळ आल्यावर आम्ही याबद्दल नक्कीच बोलू.'

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड