Bollywood Team Lokshahi
मनोरंजन

Ranbir Kapoor : विकी अन रणबीर एकत्र, कतरिना मात्र नाराज....

रणबीर कपूर याच्याशी संबंधित एका बातमीमुळे कतरिना नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : prashantpawar1

बॉलिवूड कपल विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या जोडप्याला अलीकडेच जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या प्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यातही तक्रारही दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अज्ञात व्यक्तीच्या धमक्यांमुळे अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात असतानाच तिचा माजी प्रियकर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी संबंधित एका बातमीमुळे ती नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.

खरंतर रणबीर कपूर लवकरच कतरिना कैफचा नवरा अभिनेता विकी कौशलच्या चित्रपटात दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे. विकी कौशल त्याच्या 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा एक फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपट असून करण जोहर याची निर्मिती करणार आहे. गेल्या वर्षी करण जोहरने चित्रपटातील पात्रांचे तीन वेगवेगळे पोस्टर शेअर केले होते. या चित्रपटात विकीसोबत कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील दिसणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात रणबीर कपूरचीही छोटी भूमिका असणार असल्याचे वृत्त आहे. याची अद्याप पुष्टी झालेली नाही. असं झाल्यास रणबीरसोबत विकीचा हा दुसरा चित्रपट असेल. याआधी दोघेही 2018 मध्ये संजूमध्ये दिसले होते. दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की कतरिना या डीलवर अजिबात खूश नाही.

2009 मध्ये आलेल्या 'अजब प्रेम की गजब कहानी' या चित्रपटापासून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. वर्षानुवर्षे त्यांचे प्रेम वाढू लागले आणि दोघे लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. त्यांच्या लग्ना बद्दलच्या बातम्या चाहत्यांमध्ये उडत असतानाच अचानक दोघांच्या ब्रेकअप झाल्याची बातमी आली. आज दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. रणबीरने आलिया भट्टसोबत लग्न केलं आहे. त्याचबरोबर कतरिना ही विकी कौशलसोबत खूश आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा