मनोरंजन

नाटयसृष्टीच्या सक्षमीकरणासाठी 'रंगकर्मी नाटक समूह’ सज्ज

खिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने 'रंगकर्मी नाटक समूह' हे नाटयसृष्टीतील दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

Published by : Sagar Pradhan

नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखरसंस्था. प्रेक्षक आणि रंगकर्मी ह्यांच्यामधील दुवा म्हणजे परिषद. अशा ह्या परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने 'रंगकर्मी नाटक समूह' हे नाटयसृष्टीतील दिग्ग्ज मान्यवरांचे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पॅनलच्या वतीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 'साद प्रेमाची आस परिवर्तनाची' या सूत्राने नाटक, रंगकर्मी, प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करण्यासाठी तसेच नाट्यसृष्टीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आपल्या अनेक योजना व नव्या संकल्पनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला प्रशांत दामले, विजय केंकरे, अजित भुरे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, दिलीप जाधव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

ज्येष्ठ नाटयकर्मी अजित भुरे यांनी प्रास्ताविक करत 'रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचे उद्दिष्ट व निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची ओळख यावेळी करून दिली. हौशी, व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर ह्यासारख्या रंगकर्मींबरोबरच ज्येष्ठ, कनिष्ठ रंगकर्मीना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल उपाययोजना तसेच रसिक आणि रंगकर्मी ह्यांच्यातील नातं जे हरवत चाललं ते नातं अधिक दृढ करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने आम्ही आपणासमोर येत असल्याचे या 'पॅनलने यावेळी सांगितलं. नाट्यपरिषदेच्या माध्यमातून नवनवीन अनेक संकल्पना राबविण्यासाठी तसेच नाट्यगृहांच्या अवस्थेबद्दल ठोस उपाययोजना करण्यासाठी 'रंगकर्मी नाटक समूह' पॅनल मध्ये प्रत्यक्ष कृती करणारी मंडळी आहेत आणि आपल्या कार्यातून त्यांनी ते वारंवार सिद्ध केलेले आहे. नाट्यसृष्टीचा प्रदीर्घ अनुभव असणारे रंगकर्मी या 'पॅनलचे उमेदवार आहेत. आता गरज आहे ती मतदारांच्या प्रेमळ पाठिंब्याची आणि सहकार्याची, असं सांगताना 'रंगकर्मी नाटक समूह' मधील सर्व उमेदवार व सदस्यांनी चांगल्या बदलासाठी केलेल्या सूचनांची योग्य ती दखल घेत भविष्यात रंगभूमीला पुढे नेण्याच्या दृष्टीने काम करण्याची ग्वाही दिली.

उद्दिष्ट आणि कार्य –

१) चांगली आणि व्यावसायिक नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत निर्मात्यांना पाठिंबा देणे.

२) नाटक व्यवसाय मोठा होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलणे.

३) महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या अवस्थेविषयी आढावा घेऊन सुधारणांच्या दृष्टीने पाऊल उचलणे.

४) प्रायोगिक नाटकांना राज्यस्तरावर सपोर्ट सिस्टम उभी करणे.

५) गावोगावी सभासद योजना राबवून त्याअंतर्गत नाटक व्यवसायाचे ४ प्रमुख घटक निर्माता, कलाकार, बॅकस्टेज आणि प्रेक्षक आहेत. या सर्वांच्या हितासाठी कटिबद्ध राहणार.

६) नाट्यगृहांचे व्यवस्थापन आणि देखभाल संबंधी विचार आणि कृतीआराखडा तयार करणे.

७) नाट्यप्रशिक्षण शिबिरांचा आयोजन करीत नवनव्या नाटकांची बँक तयार करण्यासाठी प्रयत्नशील.

८) नाट्यकर्मींसाठी आरोग्य विमा योजना व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कटीबद्ध.

९) नाट्यसंकुल पुन्हा उभारण्याचा प्रयत्न.

१०) नाट्यसंमेलनात नाविन्य आणणे.

११) नाट्यपरिषदेचा दरवर्षी विशेष कार्यक्रम करणे.

१२) नाट्यपरिषदेला डिजिटली भक्कम करत विविध योजना, कार्यक्रम यांची माहिती रसिकांपर्यंत व नाट्यकर्मीं पोहोचविण्यात येईल.

१३) नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार.

'रंगकर्मी नाटक समूह उमेदवार यादी

मध्यवर्ती शाखा

प्रशांत दामले, विजय केंकरे, अजित भुरे , सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, दिलीप जाधव, सुशांत शेलार, सविता मालपेकर, विजय सूर्यवंशी

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ