Marathi Movie 
मनोरंजन

Marathi Movie: इतिहास, शौर्य आणि मंत्रमुग्ध करणारे दृश्यांसह ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट प्रेक्षकांसमोर, ३० जानेवारी पासून थिएटरमध्ये प्रदर्शित

Historical Epic: ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा प्रसंग भव्य रंगमंच, मंत्रमुग्ध करणारे दृश्य आणि संगीतासह प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ हे सगळंच अगदी भारावून टाकणारं आणि अशातच भरजरी वस्त्र, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला लटकणारी भवानी तलवार यांसह घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले आणि एकच जल्लोष झाला. निमित्त होते ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील प्रसंगाच्या सादरीकरणाचे.

शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ ३० जानेवारीला प्रेक्षक भेटीला येणार आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील सहावे पुष्प असलेल्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथमदर्शन यावेळी उपस्थितांना अनुभवता आले. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या रूपात नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.

या चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ गीताचे दमदार सादरीकरण यावेळी करण्यात आले. दिग्पाल लांजेकर यांनी हे गीत लिहिले असून अवधूत गांधी, अमिता घुगरी यांचा स्वरसाज गीताला लाभला आहे. अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचे संगीत गीताला लाभले आहे. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. 'मुगाफी पल्स’ हे अॅप्लिकेशन वापरून या चित्रपटाच्या पटकथेचे विश्लेषण करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा