प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
रणवीर अनेकदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतो. त्याचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात. अनेकदा त्याला ट्रॉलिंगलादेखील समोरे जावे. मात्र यावेळी त्याने शोमधील एका महिलेला आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याने संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या वादावर समय रैनाने भाष्य करत इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ त्याच्या चॅनलवरून काढून टाकल्याचे म्हटलं आहे. या सगळ्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे. इन्स्टा पोस्टमधून समय रैनानं आपलं म्हणणं मांडलं.
रणवीर अलाहाबादिया बेपत्ता
तर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे रणवीर अलाहाबादियाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबई पोलिस चौकशी दरम्यान रणवीरच्या घरी गेले तेव्हा घराला कुलूप होते. रणवीर पोलिसांच्या संपर्काबाहेर आहे. त्याचा फोन देखील बंद असल्याचं समोर आलं आहे. त्याचसोबत तो घरातून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे.