मनोरंजन

रणवीर -दीपिका लवकरचं देणार गुड न्युज, रणवीरने केला खुलासा

Published by : Lokshahi News

बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असणारे जोडपे म्हणजे रणवीर सिंह -दीपिका पादुकोण. सोशल मीडियावरही हे दोघे प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच चाहतेसुद्धा या दोघांची जाईल प्रचंड पसंत करतात. २०१८मध्ये दोघांनी लग्न केले. इंडस्ट्रीमध्ये फेवरेट कपलपैकी हे एक कपल आहे. सोशल मीडियावर दोघे नेहमी एकमेकांना पोस्ट लिहित असतात. रणवीरचा 'द बिग पिक्चर' हा शो कलर्स चॅनलवर कालपासून सुरू झाला आहे.

यातील एका सदस्यासोबत फॅमिली प्लॅनिंगबाबत बोलताना रणवीर सिंग एक मोठा खुलासा केला आहे. रणवीर सिंग म्हणाला की, २ ते ३ वर्षात आम्हाला मुले होतील. मलाही एक गोंडस बाळ कोणीतरी दिले तर आयुष्य सेट होईल. मी मुलांची नावे शॉर्टलिस्ट करत आहे. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी सूर्यवीर सिंह नाव ठेऊ का?' शोच्या सुरुवातीला रणवीर स्पर्धकासह 'राम लीला गोलियों की रासलीला' या चित्रपटातील 'ततड़ ततड़' या गाण्यावर डान्स केला.

त्यानंतर रणवीर स्पर्धकाची ओळख करून देतो आणि म्हणतो, "कृपया लक्षात घ्या. त्याचा स्वॅग खूप भारी आहे आणि त्याचा अंदाज शहरात चर्चेचा विषय राहिली आहे. कृपया गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील अभय सिंह यांचे स्वागत करा". 16 ऑक्टोबरपासून कलर्स, वूट आणि जिओ टीव्हीवर दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता 'द बिग पिक्चर' दाखवला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा