Ranveer Singh  Team Lokshahi
मनोरंजन

Ranveer Singh : न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगविरुद्ध एफआयआर दाखल

रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या यूनिक स्टाइलसाठी (Unique style) ओळखला जातो. रणवीर नेहमीच त्याचे स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आहे. पण रणवीर सिंगचे हे न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) अनेकांना आवडले नाही. आता हे फोटोशूट त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. आता रणवीर सिंगविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत रणवीर सिंगवर 'महिलांच्या भावना दुखावल्याचा' आरोप करण्यात आला आहे. एका एनजीओने रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल केल्याचेही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

एकीकडे जेथे रणवीर सिंगच्या या फोटोशूटला ट्रोल केले जात आहे तर दुसरीकडे आलिया भट्ट, अर्जून कपूर, स्वरा भास्कर आणि असे अनेक बॉलिवूड स्टार त्याला सपोर्ट करताना दिसत आहे. रणवीर सिंगने त्याच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया देत म्हणाला की, मला फरक नाही पडत की, लोक माझ्या फॅशनबद्दल काय विचार करतात. तो पुढे म्हणाला की, त्याला जे आवडते तेच करतो. ज्याला याचा त्रास आहे तो नरकात जा.

रणवीर सिंग 'रॉकी और रानी और प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्टसोबत आणि 'सर्कस'मध्ये पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिससोबत दिसणार आहे. रणवीर सिंग अखेरचा शालिनी पांडेसोबत 'जयेशभाई जोरदार' चित्रपटात काम करताना दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा