Ranveer Singh  Team Lokshahi
मनोरंजन

Ranveer Singh : न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगची पहिली पोस्ट चर्चेत

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांच्या मनात चांगली जागा निर्माण केली आहे. रणवीर हा सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय असतो.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांच्या मनात चांगली जागा निर्माण केली आहे. रणवीर हा सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय असतो. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. एकीकडे यावरुन रणवीरला ट्रोल केले जात असताना दुसरीकडे अनेक कलाकार त्याचे समर्थन करत असल्याचे दिसत आहेत. नुकतंच न्यूड फोटोशूटच्या नंतर रणवीर सिंगने एक पोस्ट शेअर केली आहे.

रणवीर सिंगला आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेकडून ब्रँड एंडोर्सर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. याची पोस्ट शेअर करत “मी एका अॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये कॉपी रायटर म्हणून माझा प्रवास सुरु केला आणि आता प्रतिष्ठित ब्रँड एंडोर्सर ऑफ द इअर या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. जीवनाचे एक चक्र पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटनेचे खूप खूप धन्यवाद”, असे त्याने कॅप्शन दिलं आहे.

रणवीरच्या या फोटोवर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. रणवीरच्या या फोटोवर कमेंट करताना सिद्धार्थने ‘खूप खूप अभिनंदन भावा’ असे म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच