Hindi debut soon  Team lokshahi
मनोरंजन

रश्मिका करणार लवकरच हिंदीमध्ये पदार्पण

'एनिमल' या सिनेमात रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Published by : Team Lokshahi

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) लवकरच हिंदी चित्रपटांमधून आपल्या सर्वांना दिसणार आहे. नुकताच तिचा पुष्पा (Pushpa) हा चित्रपट संपूर्ण देशभर चालला. या चित्रपटांमधील श्री वल्ली या गाण्याने तर सर्वांना वेड लावले आहे. त्याचबरोबरीने तिचे आधीचे चित्रपट डियर कॉम्रेड, गीता गोविंन्दा हे चित्रपट सुद्धा हिंदी पट्ट्यामध्ये चांगलेच गाजले आहेत. यामुळे तिच्या सर्व चाहत्यांना अपेक्षा होती कि तिने हिंदीमधून सुद्धा काम करावे आणि लवकरच आपल्या हिंदी चित्रपटा मधून आपल्या सर्वांसमोर दिसावे.

रश्मिका लवकरच 'Animal' या सिनेमात दिसणार आहे. रश्मिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी (Instagram Story) पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तिने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर करत अशी कॅप्शन दिली आहे की, 'चांगला दिवस चांगल्या बातमीसह येतो'. तिने या पोस्टमध्ये 'उगडी' आणि 'गुढी पाडवा' संदर्भात GIFs ही वापरल्या आहेत. 'एनिमल' या सिनेमात रणबीर कपूर (Rasmika Mandanna and Ranbir Kapoor Animal) मुख्य भूमिकेत आहे. रणबीर आणि रश्मिका एकत्र दिसणार म्हटल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अनेकांनी रश्मिकाच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

या सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून पुढील वर्षी 11 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये येण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती तरण आदर्श (Taran Aadarsh) यांनी ट्वीट करत दिली आहे. हा सिनेमा एक क्राइम ड्रामा (Crime Drama) असणार आहे. एनिमलची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरिज, मुराद खेतानीचा सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वांगाचे भद्रकाली प्रोडक्शन याद्वारे करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा

IND vs ENG : कॅच निसटला आणि सामना फसला! पंतच्या झेलाचा इंग्लंडला फटका