मनोरंजन

रात्रीस खेळ चाले-3 मालिकेत दिसणार या 2 लोकप्रिय अभिनेत्री

Published by : Lokshahi News

झी मराठी वाहिनीने सध्या प्रेक्षकांच्या मागणीनुसार मोठे फेर बदल केलेले दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. यात सर्वात जास्त आतुरता असलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचे तिसरे सिझन देखील नुकतेच सुरू झाले आहे.

रात्रीस खेळ चाले-३ या मालिकेत आणखीन कोणत्याही अभिनेत्रीला दाखविण्यात आले नव्हते. परंतु, आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो आला असून त्यात पौर्णिमा डे ही अभिनेत्री दिसून येत आहे. तुला पाहते रे मालिकेत सौन्याची भूमिका साकारली होती. पौर्णिमा डे आता त्या मालिकेप्रमाणेच रात्रीस खेळ चाले मध्ये देखील नकारात्मक भूमिकेत दिसणार, असेच प्रोमो मधून वाटत आहे.

प्रोमो नुसार पौर्णिमा माईकडून जबरदस्तीने वाडा मिळवायला दिसून येत आहे. परंतु, तितक्यात माईचा मुलगा अभिराम तिथे आलेला दिसून येत आहे. या मालिकेत शेवंताचे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर दिसणार का हा प्रश्न सर्वच फॅन्सना पडला होता. परंतु, याबाबतीत सत्य माहिती समोर आली आहे.

आपल्या अदांनी रात्रीस खेळ चाले-२ सीझन गाजवणारी अपूर्वा नेमळेकर ही देखील मालिकेत दिसून येणार आहे. येत्या काही भागात अपूर्वा प्रेक्षकांना दिसणार असल्याचे समजते. परंतु, यावेळी मालिकेत खूप वेगळेपणा पाहायला मिळणार आहे. याची एक झलक पहिल्या भागापासुनच फॅन्सना पहावयास मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी देखील मालिका हिट होण्याची शक्यता आहे.

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...